पत्रकार सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) शिरपूर तर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५ काल २४ ऑगस्ट रविवारी कालिदास वैद्य नगर, खरदे येथील श्री लक्ष्मी लॉन्स येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात शिरपूर शहर व तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच एम.पी.एस.सी. आणि यू.पी.एस.सी. मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे. पं. हिरे, थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन पाटील, पोलीस टुडे चे संपादक रत्नदीप भाऊ सिसोदिया, सौ. सारिका ताई पाटील, हिंदू एकता संघाचे जिल्हा प्रचारक बाळकृष्ण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष डॉ. निखिल पंतवैद्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या पालकांसोबत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण दिले. यावेळी सर्व गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व फोल्डर प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमानंतर पत्रकार सेवा संघ, शिरपूर तर्फे सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रवदन गुजराती, युवराज राजपूत, अध्यक्ष विजय चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष विजय शुक्ल, तालुका सचिव योगेश पाटील, शहराध्यक्ष मयूर वैद्य, उपाध्यक्ष भरत रोकडे, कार्याध्यक्ष अनिल वाघ, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष जितेंद्र शेटे, राज्य संपर्कप्रमुख दिलीप पाटील, ज्येष्ठ सल्लागार रवींद्र भावसार, भरत पगारिया, तसेच कार्यकारिणी सदस्य संतोष भोईर, जयपाल चौधरी, गोकुळ महाले, जगदीश सोनवणे, प्रवीण शर्मा आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी निलेश सावळे
साक्री

