धुळे- शिरपूर तालुक्यातील नवे आढे गावात दोन गटात हाणामारी झाली . यात ३ जण जखमी झाले तर १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैन्यदलात असलेल्या सुनील कोकट पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास नवे आढे गाव येथे येऊन जमावाने त्यांना व त्यांच्या साथीदारांना लाठ्या, काठ्या, चाकूने मारहाण केली. यात सुनील पारधी यांच्यासह पूनम पारधी , दीपक पारधी हे जखमी झाले. गावातील बसस्थानक परिसरात झालेल्या या घटनेमुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला.
थाळनेर पोलिसांनी २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यापैकी १२ जणांना २३ ऑगस्ट रोजी दुपारी अटक करण्यात आली आहे. यात हर्षल कैलास कोळी, वय २१ वर्ष,चेतन दिनेश कोळी, वय -२२ वर्षे, निखील संतोष कोळी, वय-२१ वर्षे, प्रशांत विजय सावळे, वय-२२ वर्षे, विजय रंजीत भिल, वय- २० वर्षे, रंजीत जंगलु भिल, वय- २३ वर्षे, पवन प्रकाश भिल, वय- २० वर्षे, रोहीत रामचंद्र कोळी, वय-१२ वर्षे,संजय नागो कोळी, वय-२३ वर्षे, एकनाथ उर्फ दादु राजेंद्र सोनवणे, वय-२१ वर्षे, राहुल राजेंद्र देवरे, वय-२१ वर्षे, गणेश साहेबराव कोळी, वय-२७ यांचा समावेश आहे. अद्याप १० ते १५ जणांचा शोध सुरु असून थाळनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हर्षल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपस सुरु आहे.
