धुळे : महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी, लोकशाहीला बाधक व जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याचा आरोप करत आज धुळ्यात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांसह विविध संविधान प्रेमी संघटनांनी गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन केले.
राज्यव्यापी आंदोलनाच्या आवाहनानुसार धुळ्यातील नेते व कार्यकर्ते एकत्र जमले. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी “जन सुरक्षा कायदा मागे घ्या” अशी मागणी केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, “हा कायदा लोकशाहीस घातक असून शासनाने तो तातडीने मागे घ्यावा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
-प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

