धुळे महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात नागरिकांचा संताप

रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

धुळे शहरातील नेहरूनगर परिसरातील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून अद्यापही अपूर्ण आहे. रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिक नागरिक व व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आज संतप्त नागरिकांनी धुळे महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला.

सदर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. याच खड्ड्यांमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यूही झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, तत्काळ रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली.

प्रतिकात्मक अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांनी “धुळे मनपा हाय हाय”, “महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुर्दाबाद” अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top