धुळे शहरासह परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या पावसामुळे मका कपाशी , कांदा, कडधान्य , ज्वारी , बाजरी यांसह अनेक शेती पिकांचा बळी लागला आहे.
धुळे तालुक्यातील आर्णी शिवारात मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत शेतकरयांचे हातात तोंडाशी आलेले मका पीक पाण्यामुळे पूर्णतः सडून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, “सरकार आमचे झालेले नुकसान भरून काढू शकत नाही; त्यामुळे सरकारकडून आमच्याकडे कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत.”
मोसमुळे झालेल्या नुकसानीवर सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

