धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आदिवासी समाजाचे नेते रवी जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
हा प्रवेश सोहळा पालकमंत्री तथा भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते पार पडणार आहे. रवी जाधव यांच्या भाजप प्रवेशामुळे आदिवासी समाजात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

