जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात आर्यन चौफुली जवळ असलेल्या आर्यव्रत या केमिकल कंपनीला आज सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
आगीची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचे पाच ते सहा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीमध्ये कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, नेमके आर्थिक नुकसान किती झाले याचा अधिकृत आकडा अद्याप उपलब्ध नाही.

