डोगराळेतील 5 वर्षीय बालिकेवरील अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची मागणी

निजामपूर–जैताणे सुवर्णकार समाजाचा मुक मोर्चा

निजामपूर – मालेगाव तालुक्यातील डोगराळे येथे 5 वर्षीय निरागस बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्दयी हत्येच्या घटनेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीवर जलद गती न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निजामपूर–जैताणे आहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आली.

या मागणीसाठी समाजाच्या सदस्यांनी मुक मोर्चा काढत निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केवळ 5 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खुनामुळे परिसरात तीव्र भीती, असुरक्षितता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

समाज व ग्रामस्थांनी या घटनेचा जाहीर निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी पोलीस ठाण्याचे स.पो.निरीक्षक मयुर भामरे यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली.

मुक मोर्चात समाज अध्यक्ष नंदकुमार विसपुते, तुषार सोनवणे, अरविंद जाधव, छोटू जाधव, घनशाम वाघ, कल्पेश जाधव, प्रतिक विसपूते, संतोष विसपूते, महेश सोनवणे, राजेंद्र वाघ, चंद्रकांत विसपुते, विवेक वाघ, कमलेश वाघ, मनोज सोनवणे, राहुल वाघ, आकाश सोनवणे, रूषी थोरात, विपूल विसपुते, धर्मराज विसपुते, संजय विसपुते, संजय बागूल, शातीलाल भदाणे, पत्रकार रघुवीर खारकर, हेमंत महाले तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

घटनेतील आरोपीविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top