दोंडाईचा – नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक ५-ब मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राखीबाई रविंद्र उपाध्ये यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यांच्या माघारीनंतर या प्रभागातून भाजपाच्या भारती विजय मराठे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
यामुळे दोंडाईचा नगर परिषदेतील भाजपाच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या आता ८ वर पोहोचली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मिळालेल्या या सततच्या बिनविरोध विजयांमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-प्रतिनिधी समाधान ठाकरे

