पिंपळनेर नगरपरिषदेतील भाजप उमेदवार कुसुमबाई पाथरे यांचे निधन; प्रभाग 2B ची निवडणूक बरखास्त

पिंपळनेर शहरात सुरु असलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या उत्साहात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. भाजपा उमेदवार कुसुमबाई खंडू पाथरे (वय 75) यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पाथरे कुटुंबियांसह भाजप कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुसुमबाई पाथरे या दिवंगत आबासाहेब खंडू पाथरे यांच्या आई असून, यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून प्रभाग 2B मधून उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. पिंपळनेर नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक असल्याने विविध पक्षांचे इच्छुक चुरशीने मैदानात उतरले आहेत. प्रभाग 2B मध्ये कुसुमबाई पाथरे (भाजप), आशा महेश वाघ (काँग्रेस) आणि वसिमा आबिद शेख (शिवसेना) अशी तिरंगी लढत होती.

मात्र, उमेदवारीसाठी सक्रिय प्रचार करत असतानाच सोमवारी मध्यरात्री कुसुमबाईंना अचानक हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर प्रभाग 2B मधील निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेजूळ यांनी दिली. या अनपेक्षित घडामोडीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top