साक्रीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

साक्री शहरातील आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिनाची अत्यंत आदरपूर्वक आणि भावपूर्णरीत्या नोंद करण्यात आली. महामानव, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारताचा कोहिनूर अशी ओळख असलेल्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाजबंधूंनी कोटी-कोटी नमन केले. यावेळी उपस्थितांनी त्रिशरण आणि पंचशीलचा स्वीकार करून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना मानवंदना दिली.

कार्यक्रमास समाजबंधू व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुतळा पूजन व अभिवादन कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी, मा. नगराध्यक्षा जयश्री पवार, मा. नगराध्यक्ष बापूसाहेब गीते, मा. नगरसेविका अॅड. पूनम काकुस्ते, नगरसेवक दीपक वाघ, सुमित नागरे, पंकज मराठे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद बेडसे, विजय भोसले, महेंद्र देसले, आर.पी. भामरे, अविनाश सोनार, राजेंद्र वाघ, रजनीकांत वाघ, राजेंद्र सामुद्रे, प्रा. कैलास वाघ, प्रताप वेंदे, जी.टी. मोहिते, प्रा. आर.डी. साळवे, डी.एम. मोहिते, अनिल मगर, पंडित साळवे, दिलीप वाघ, नाना वाघ, सतीश मोहिते, सुधीर सोनवणे, रामदास बच्छाव, कपिल वाघ, दशरथ अहिरे, बंटी अहिरे यांसह हजारो अनुयायी उपस्थित होते.

प्रतिनिधी निलेश सावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top