धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंग यांचे निधन

धुळे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुद्वारा साहिबचे प्रमुख बाबा धीरजसिंग यांचे आज निधन झाले. गेल्या आठवड्यात गुरुद्वारातीलच एका सेवेकऱ्याने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.

हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती सतत बिघडत असल्याने त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top