महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार रविवारी पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. एकत्र प्रवास करताना त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय मैदानात चर्चांना सुरुवात झाली आहे. तसेच ही नव्या राजकारणाचा खेळ तर नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. असाच प्रश्न भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी आपली मत स्पष्ट केले. “मला वाटतं त्यात काही राजकारणाची नांदी नसेल. एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याशी बोलणं, त्याच्या कुठल्या समारंभाला जाणं, त्याच्याबरोबर गाडीत बसणं या गोष्टींचा काही अर्थ लावण्याची गरज नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे लोक आज मंचावर होतो.” असे भाजप नेते पंकजा मुंडे म्हणाल्या