मीरा रोड येथील सरस्वती वैद्य आणि चर्चगेट येथील हॉस्टेलमध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एका हत्याकांडाने मायानगरी मुंबई हादरली आहे. दक्षिण मुंबईतील वरळी समुद्रकिनारी गोणीत तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचे हात-पाय तोडलेले आहेत. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणीचे वय 18 ते 30 दरम्यान असल्याचे कळते. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तिच्या मृतदेहाची समुद्रात विल्हेवाट लावण्यात आली. पण समुद्राला आलेल्या भरतीमुळे हा मृतदेह बाहेर आला.