धावत्या बसमध्ये महिलेची प्रसूती
नाशिकहून नंदुरबारकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एक आदिवासी महिलेची प्रसूती झाली. ही घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी सटाणा रस्त्यावर घडली. बसचालक, महिला वाहक, पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाश्यांच्या मदतीने महिला आणि तिच्या बाळाला सटाणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आणि दोघेही सुखरूप आहेत. बागलाण तालुक्यातील वडे दिगर येथील अजित पवार आणि त्यांची पत्नी पूजाबाई…
