तालुक्याची जनता हीच माझी भाऊबंदकी : आ. काशिराम पावरा
शिरपूर : शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोन आमदारांचे अहोरात्र परिश्रम, दुप्पट विकासासाठी काशिराम दादा पावरा यांना भरघोस मतांनी विजयी करावे. शिरपूर तालुक्याचा विकास हेच आमचे व्हिजन आहे. पाच वर्षात एकदा येऊन नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. सर्वसामान्य नागरिकांचा विकास व्हावा यासाठी आपण गेल्या 40 वर्षांपासून मनापासून काम करत आहोत. हजारो युवकांना रोजगार दिला असून अजुनही रोजगार देण्याची देण्याची व्यवस्था करतोय. आरोग्य, पाणी, उच्च शिक्षण, रोजगार, औद्योगिक क्षेत्रात सर्व जनतेसाठी, नवीन पिढी साठी मोठी काम केले आहे. शिरपूर 60′ हा माझा शैक्षणिक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून आदिवासी व इतर अनेक विद्यार्थी घडवतोय. यातून अनेक डॉक्टर्स, इंजिनियर, मोठे अधिकारी बनवायची मोहीम यशस्वीपणे सुरु आहे.
पुढील वर्षी 120 विद्यार्थी यातून घडविणार आहेत. तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत शिरपूर पॅटर्न अंतर्गत 386 बंधारे झाले, येत्या काळात अजून 350 बंधारे तयार करणार. आरोग्याच्या सुविधा देण्यावर विशेष भर देण्यात आला. आ.पावरा हे स्वच्छ प्रतिमा असलेले लोकप्रतिनिधी आहेत. रोज लोकांशी संपर्क ठेवून संवाद साधत असतात. ते कायम जनतेशी संपर्क ठेवतात. त्यांना लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे. या निवडणुकीत आ. काशिराम पावरा यांना तालुक्यात विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प नागरिक व कार्यकर्त्यांनी केला आहे. शहर, ग्रामीण, आदिवासी भागात भाजप, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते अतिशय उत्साहात प्रचार करत असून संपूर्ण तालुक्यात भाजपामुळे वातावरण झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर तालुक्यात एम.आय.डी.सी. ची मागणी पूर्ण केली असून हजारो युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. 1 हजार बेडचे हॉस्पिटल लवकरच सुरु करुन कमी खर्चात अतिशय उत्तम आरोग्य सेवा देणार आहोत. आमदार कार्यालयात जनतेसाठी शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. आ. काशिराम दादा पावरा हे प्रामाणिक व निष्कलंक असून अशा नेत्याचे जतन करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.
शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व महायुती चे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता शहरातील पित्रेश्वर कॉलनीच्या मैदानावर जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी व्यासपीठावर आमदार अमरिशभाई पटेल, उमेदवार आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रवासी नेता दिपक देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुका महायुती समन्वयक डॉ. तुषार रंधे, जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, मनुदादा पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, विधानसभा निवडणूक प्रमुख के.डी.पाटील, तालुका प्रभारी हेमंत पाटील, ओबीसी प्रदेश सचिव श्यामकांत ईशी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, शहराध्यक्ष हिरा वाकडे, दिनेश मोरे, ऍड. आशिष अहिरे, शिवसेना तालुकाध्यक्ष कन्हैया चौधरी, शहराध्यक्ष मनोज धनगर, आरपीआय अध्यक्ष बाबा थोरात, महायुती पदाधिकारी, रोहित रंधे, सलीम खाटीक, पप्पू माळी, संतोष माळी, भुरा राजपूत, गणेश सावळे, हर्षल राजपूत, किरण दलाल, पिंटू शिरसाठ, रज्जाक कुरेशी, इरफान मिर्झा, राजू शेख, चंदू पाटील, निलेश गरुड, रोहित शेटे, बापू थोरात, सुरेश अहिरे, संजय आसापुरे, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, महिला मोर्चा अध्यक्ष संगिता देवरे, विविध मोर्चा पदाधिकारी, शहर व तालुक्यातील नागरिक, महिला, पुरुष, युवा वर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
आमदार काशिराम पावरा म्हणाले, शिरपूर तालुका सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर राहण्यासाठी आतापर्यंत शासनाच्या अनेक योजना आम्ही यशस्वीपणे राबविल्या. भाई व मी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी आणून तालुक्याचा विकास साधतोय. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी आमदार कार्यालयामार्फत 120 स्वयंसेवक युवकांमार्फत यंत्रणा राबविली जात आहे. विकास… विकास… विकास…शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. गेल्या 15 वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केले असून यापुढे दुप्पट कामे करणार असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले.
