संभाजीनगरमध्ये येणाऱ्या मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचा लाभ धुळे शहराने घ्यावा, असे प्रतिपादन डीएमआयसीचे संचालक भास्कर मुंडे यांनी केले. टोयोटा किर्लोस्कर, पिरामल फार्मा, आयएसडब्लू ग्रीन मोबिलिटी, ऐथर एनर्जी या मोठ्या उद्योग समूहांनी संभाजीनगरमध्ये ₹६०,००० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याचे निश्चित केले असून, याचा व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
धुळे व्यापारी महासंघाच्या बिझनेस फोरमच्या वतीने संभाजीनगर येथे दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौर्यात उद्योगांना भेटी, डीएमआयसी परिसराचा आढावा, औद्योगिक संघटनांशी चर्चा आणि धार्मिक स्थळांचे दर्शन असा कार्यक्रम होता. या अभ्यास दौर्यात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितिन बंग व अजय नाशिककर यांच्या नेतृत्वाखाली सुरेश कुंदनानी, किशोर डियालनी, तनुकुमार दुसेजा, सतीश भावसार, सुरेश दंडवानी, जेठानंद हसवानी, तुलसीदास सिंधी, अभिषेक सूर्यवंशी, सुशील कालड़ा, सुरेश बंग, जमनादास लखवानी, विजयानंद मोरे, अशोक वधवा, संजय विसपुते, सुनील विभांडिक, सुमित तोलानी आणि सागर वधवा यांनी सहभाग घेतला.
संभाजीनगर औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीचा आढावा घेताना, एमआयजी औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष संतोष लड्ढा यांच्या सोबत, शाम राठी, रूपेश बाहेती, दयानंद मोदनी, आनंद लड्ढा, कमलकिशोर काबरा, श्रीनिवास सोनी, नितेश लड्ढा, भगतसिंग दरक, सतीश साबू, संजय काबरा, शिवप्रसाद जाजू, जितेश साबू आणि अमित सोनी यांची बैठक झाली.
याशिवाय, कैटच्या संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष संतोष कावळे पाटील, प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष अजय शाह, संभाजीनगर व्यापारी महामंडळ अध्यक्ष संजय कांकरिया, पवन लोया, यूनुस खान, हरिसिंह सरदार यांच्यासोबतही व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. तसेच, सेटर्डे क्लबचे अध्यक्ष श्रीकांत जोगदंडे यांच्याशी देखील संवाद साधण्यात आला.
या बैठकीत संभाजीनगरमध्ये उपलब्ध औद्योगिक संधी आणि धुळे येथे असलेल्या सुविधांचा कसा लाभ घेता येईल, यावर सखोल चर्चा झाली. धुळे व्यापारी महासंघाने धुळेतील इच्छुक गुंतवणूकदारांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले असून, अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे सांगितले. या अभ्यास दौऱ्याच्या शेवटी, परतीच्या प्रवासात भद्र मारुती आणि घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यात आले.
