कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्राच्या स्थानिक सल्लागार समितीवर प्रा. डॉ. गोविंद पोद्दार आणि राहुल पोद्दार यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली असून, सचिवपदाची जबाबदारी कार्यकारी संचालक प्रा. डॉ. संजय ढोडरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ही नियुक्ती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्र हे विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी गांधी विचारांची प्रेरणा देणारे विविध उपक्रम राबवित असते. सामाजिक मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी हे केंद्र शिबिरे, परिसंवाद, कार्यशाळा, गांधी विचार परीक्षा, चित्रप्रदर्शने, चर्चा सत्र अशा अनेक उपक्रमांचे आयोजन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर करते.
नियुक्तीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात केंद्राचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लागार समिती सदस्य डॉ. शिवाजीराव पाटील, नितीन ठाकूर, पवनसेठ पोद्दार यांच्या उपस्थितीत डॉ. गोविंद पोद्दार आणि राहुल पोद्दार यांना नियुक्तीपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर नियुक्तीबद्दल माननीय कुलगुरू प्रा. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. इंगळे, कुलसचिव डॉ. पाटील यांच्यासह सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांनी नव्यानियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय ढोडरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमृत दाभाडे, गणेश गवळी आणि निलेश सोनार यांनी विशेष मेहनत घेतली.