धुळे शहरात राज्यात सर्वाधिक रक्तसंकलन! चार हजारहून अधिक बाटल्या जमा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराला धुळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमात शहरातील एकूण ४,३१३ बाटल्या रक्तसंकलन झाले असून, सर्वाधिक रक्तसंकलन करून खंडेराव महाराज मंदिर केंद्राने पहिला क्रमांक पटकावला.

शहरातील जुन्या आग्रा रोडवरील खंडेराव महाराज मंदिर केंद्राने ५७३ बाटल्या रक्तसंकलन करून या शिबिरात आघाडी घेतली. या केंद्राचे आयोजक एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे, विकी परदेशी, आकाश साखला आणि रोहित चांदोडे यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करत रक्तदात्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले, ज्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. द्वितीय क्रमांकाचे स्थान मरिमाता चौक, गल्ली क्रमांक ४ येथील केंद्राने मिळवले. त्यांनी ५३६ बाटल्या रक्तसंकलन केले. या केंद्राचे आयोजक चेतन गवळी होते. तृतीय क्रमांकावर दत्तमंदिर चौक येथील केंद्र राहिले, ज्यांनी ४५१ बाटल्या रक्तदान करून उल्लेखनीय योगदान दिले. येथे प्रथमेश गांधी आणि मोहित देसले यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली.

धुळे शहरातील केंद्रनिहाय रक्तसंकलन :-

क्रमांककेंद्राचे नावसंकलन (बाटल्या)
1खंडेराव मंदिर, आग्रा रोड573
2मरिमाता चौक, गल्ली क्र. 4536
3दत्तमंदिर चौक451
4मारुतीनगर, चाळीसगाव चौफुली344
5वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक270
6कुंभार खुंट, जुने धुळे153
7पंचवटी चौक, देवपूर150
8क्रांती चौक137
9नेहरू चौक133
10मनपा शाळा क्र. 9, हिंदू एकता चौक117
11मारुती मंदिर (वर्षावाडी), मोहाडी116
12छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पारोळा रोड111
13शाळा क्रमांक 28, मिल परिसर110
14अग्रसेन चौक95
15स्वराज जिम, मिल परिसर91
16अभय महाविद्यालय परिसर89
17आमदार अनुप अग्रवाल जनसंपर्क कार्यालय85
18जिल्हा क्रीडा संकुल चौक83
19सरकारी आपला दवाखाना, वलवाडी80
20अयोध्यानगर, साक्री रोड80
21विघ्नहर्ता गणपती मंदिर, इंदिरा गार्डन79
22नगावबारी चौफुली69
23शनीनगर चौक60
24संत गाडगेबाबा भुवन (मोगलाई)60
25जलारामबाप्पा मंदिर (नटराज चित्रपटगृह)60
26त्रिकोणी गार्डन (प्रभाग 11)55
27बहावलपुरी पंचायत, साक्री रोड41
28विठ्ठल-रखुमाई मंदिर, वाखारकरनगर38
29मतिमंद शाळा, मोराणे27
30प्रसन्न हनुमान मंदिर (प्रभाग 11)20
एकूण4313 बाटल्या

यावेळी एकूण ३० हून अधिक ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून समाजासाठी आपले कर्तव्य पार पाडल्याचे उदाहरण ठेवले. या उपक्रमामुळे शहरात रक्तसाठा मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत झाली असून, गरजू रुग्णांसाठी ही मोठी सामाजिक देणगी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top