शिरपूरातील होळनाथे येथे महसूल सप्ताहानिमित्त समाधान शिबिर

तालुक्यात सर्वाधिक 163 जिवंत सातबाऱ्यांची नोंद

महसूल सप्ताह 2025 अंतर्गत शिरपूर तालुक्यातील होळनाथे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी अनेक सुविधा घरपोच देण्यात आल्या.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक होते. यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जितेंद्र राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष के. डी. पाटील तसेच स्थानिक सरपंच व महसूल अधिकारी उपस्थित होते.

शिबिरात जिवंत सातबारा मोहिम, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, रेशन कार्ड दुरुस्ती, प्रलंबित फेरफार नोंदी, तसेच इतर आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, या शिबिरात 163 जिवंत सातबाऱ्यांची नोंद करण्यात आली असून, हा आकडा शिरपूर तालुक्यातील सर्वाधिक आहे. तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, या शिबिरास ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आणि महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. नागरिकांचा हा सकारात्मक प्रतिसाद समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top