साक्री (प्रतिनिधी) – जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून साक्री तालुका आदिवासी आघाडीचे तालुकाप्रमुख गोविंदा सोनवणे व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेतील १५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाद्याचे वाटप केले. या उपक्रमामुळे आदिवासी दिनाला सामाजिक उपक्रमाची जोड मिळाली.
कार्यक्रमाला जिल्हा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर गावित, नगराध्यक्षा सौ. उषाताई पवार, उपनगराध्यक्षा उज्वला भोसले, नगरसेवक जयश्री पगारिया, राहुल भोसले, सुमित नागरे, स्वीकृत नगरसेवक पंकज हिरे, तालुका शिवसेना प्रमुख पंकज मराठे, सरपंच अजय सोनवणे, माजी जि.प. सदस्य विजय ठाकरे, तसेच विविध पक्ष व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख शिला दिदी, सुनंदा दिदी, गीता दिदी, रोशनी दिदी, एस.एम. जाधव सर, साळुंखे सर यांचीही खास उपस्थिती होती. भगवान एकलव्य व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच नगरपंचायतीला भगवान एकलव्यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
या वेळी शिला दिदी यांनी भगवान एकलव्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाचे महत्व स्पष्ट केले. जिल्हा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर गावित यांनी, मिरवणुका व डीजे यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा सामाजिक उपक्रमातून आदिवासी दिन साजरा करण्याच्या गोविंदा सोनवणे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान किरण दशरथ सोनवणे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन बाळा शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन गोविंदा सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास माळचे, सुरेश सोनवणे, रोहित पवार, मिथुन सोनवणे, बंटी अहिरे, तापीराम माझे, बंटी पगारे, किशोर गायकवाड, दिनेश ठाकरे, हुसेन सोनवणे, गुड्डू पठाण, सुरेश गोसावी, किशन शिंदे, सनी नंदिरे, गोरख पवार, विशाल वाघ, गणेश सोनवणे, विकी बाबर, राजेश माळचे, भाषण चव्हाण, भूषण गाडे, वैभव सोनार आदींनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी निलेश सावळे, साक्री

