ण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंडळाने वृंदावन येथून आणलेल्या मातीतून गणेशाची आकर्षक मूर्ती साकारली असून त्यात गाईला देण्यात येणाऱ्या चाऱ्याचाही वापर करण्यात आला आहे.
गेल्या १३ वर्षांपासून या मंडळात एकदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली नाही. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी शंभर टक्के पर्यावरणपूरक मूर्तीचाच संकल्प कायम ठेवला जातो.
याविषयी बोलताना मंडळाचे अध्यक्ष गिरीश अरोरा म्हणाले, “आमच्या मंडळाच्या वतीने वर्षभर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा उपक्रम राबविला जातो. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी ही आपली आहे, याच विचारातून आम्ही गणेशोत्सव देखील इको-फ्रेंडली पद्धतीने साजरा करतो. यंदा वृंदावन येथून माती आणून गणेशाची मूर्ती घडवली असून त्यात अत्यल्प प्रमाणात पर्यावरणपूरक रंग वापरला आहे.”
धुळेकरांसाठी दरवर्षी काही ना काही वेगळं करून दाखवणारे कष्टभजन मित्र मंडळ या वर्षीही गणेशोत्सवात आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

