निजामपूर पोलिसांची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड

निजामपूर (ता. मालेगाव) — अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला निजामपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणात आरोपीकडून सोन्या–चांदीचे दागिने, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ₹1,86,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील

तक्रारदाराने १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची १४ वर्षे ६ महिने २४ दिवस वयाची मुलगी (काल्पनिक नाव – निर्भया) हिला ११ नोव्हेंबर रोजी पहाटे आरोपी गणेश मंगलदास ठाकरे (वय १९, रा. नवापाडा, ता. साक्री) याने पळवून नेले होते.

या प्रकरणी निजामपूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 294/2025 भा.द.वि. कलम 2023 थे क. 137(2), 87 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी १५ नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली.

अत्याचाराची कबुली

न्यायालयाने मॅजिस्ट्रेट कस्टडी दिल्यानंतर तपासादरम्यान पिडीत मुलीचा जबाब घेण्यात आला. त्यात तिने आरोपीने अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यामुळे गुन्ह्यात भा.द.वि. कलम 67 सह POCSO कायद्याचे कलम 4 वाढ करण्यात आले.

२४ नोव्हेंबर रोजी आरोपीला पुन्हा पोलिस कस्टडीत घेतले असता, पिडीत मुलीला फुस लावून पळवून नेताना तिला घरातील सोन्या–चांदीचे दागिने आणण्यास सांगितल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याने हे दागिने पिडीतेकडून घेऊन पांगणजवळील शेतात जमिनीत लपविले, असेही सांगितले.

पोलिसांनी पंचनामा करत सदर दागिने जप्त केले. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईलही ताब्यात घेतले.

मुद्देमाल (एकूण ₹1,86,000/-)

  • सोन्याचे व चांदीचे दागिने
  • मोटारसायकल
  • मोबाईल

पोलीसांची टीम

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सपोनि मयुर भामरे, मसपोनि प्रियदर्शनी थोरात, पोउपनि चंद्रकांत गायकवाड, पोउपनि मधुकर सोमोसे, पोउपनि यशवंत भामरे, तसेच असइ कलीम शेख यांच्यासह मोठ्या पथकाचा सहभाग होता.

आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे.

-प्रतिनिधी हेमंत महाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top