साक्री येथे भारतीय संविधान दिन भाजपा साक्री मंडळाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा मध्यवर्ती कार्यालयात पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री ना. जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान प्रतिमेचे पूजन करून संविधान दिनाचे औचित्य साधण्यात आले.
या प्रसंगी बोलताना ना. रावल म्हणाले की, भारतीय संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून देशाची आत्मा आणि लोकशाहीचे बळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या मंत्राच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पक्ष संविधानाने घालून दिलेल्या मूल्यांनुसार कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. सुशासन, पारदर्शकता आणि प्रत्येक नागरिकाचा विकास ही पक्षाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले, माजी नगराध्यक्ष जयश्रीताई पवार, साक्री मंडलाध्यक्ष महेंद्र देसले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष व नगरपरिषद पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ, नगरसेविका जयश्री पगारिया, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष ऍड. पूनमताई काकुस्ते, माजी तालुका सरचिटणीस ऋषिकेश मराठे, साक्री मंडल सरचिटणीस दीपक कोठावदे, आदिवासी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पवार, अशोक सुडके आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा कार्यकर्त्यांनी संविधान दिनानिमित्त राष्ट्रनिष्ठा आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता केली.
-प्रतिनिधी निलेश सावळे

