धुळे तालुक्यातील चौगाव येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल बस पलटी झाल्याची घटना उघडकीस आली, आणि त्यानंतर ही बस सरळ करण्यासाठी गेलेला क्रेन देखील बस सरळ करीत असताना पलटी झाला आहे, या ट्रॅव्हल बसच्या अपघातामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला असून क्रेन चालक देखील गंभीररित्या जखमी झाला आहे, तर ट्रॅव्हल बस मधील जवळपास 30 ते 35 जण जखमी झाले आहेत, जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,ट्रॅव्हल्समधील प्रवाशी महिला व तिच्या दीड वर्षांच्या बाळाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

राजस्थानहून हैद्राबादकडे जाणारी ट्रॅव्हल्स धुळे तालुक्यातील चौगाव गावापुढे असलेल्या घाटात रस्त्याच्या किनारी पलटली होऊन मोठा अपघात झाल्याची दुर्घटना उघडकीस आली आहे, या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स चालकासह एक महिला व तिचे दीड वर्षांचे बाळ दगावले आहे, तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत, घाटामध्ये ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्याकडेला पलटली, या अपघातात ट्रॅव्हल्स बस चालक हा गंभीर जखमी होवून दगावला, तर सहचालकाची प्रकृती गंभीर आहे, शिवाय ट्रॅव्हल्समधील प्रवाशी महिला व तिचे दीड वर्षांचे बाळही या अपघातात दगावले आहे, तर या अपघातामध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे, यात गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
– प्रतिनिधी कार्तिक सोनवणे,झेप मराठी न्यूज