
संस्था चालकांनो, विद्यार्थ्यांच्या सुरक्षा पुरवा अन्यथा शाळांवर कठोर कारवाई
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा इशारा धुळे, दिनांक 26 ऑगस्ट : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनाने प्रत्येक शाळेमध्ये सुरक्षाविषयक आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक…