धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाट्याचे दर गगनाला
पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात झपाट्याने वाढ धुळे │ जोरदार पावसाचा फटका आता थेट भाजीपाल्याच्या बाजारात जाणवू लागला आहे. महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात सलग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, भाजीपाल्याची आवक घटली असून दर गगनाला पोहोचले आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज टमाट्याच्या २० किलोच्या कॅरेटचा दर तब्बल ७५० ते…
