राज्याच्या कांदा धोरण समितीवर शंकरराव खलाणे यांची नियुक्ती
राज्यातील कांदा उत्पादन, बाजारभाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणाऱ्या राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अंतर्गत कांदा धोरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीवर नेर (ता. धुळे) येथील कांदा तज्ज्ञ, निर्यातदार व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीसाठी राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार…
