
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला पंचायत राजचा थेट अनुभव
धुळे : ‘100 दिवस कृती कार्यक्रम’ मोहिमेअंतर्गत धुळे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 6 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना प्रशासनाचा थेट अनुभव मिळावा, यासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावर ‘एक दिवसीय क्षेत्रभेट कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या विविध विभागांना भेट…