भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
नाशिक : पिंपरी-चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना आजाराने गाठलं होत. आज अखेर त्यांच उपचारादरम्यान निधन झालं. पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून…
