नरडाण्यात 500 रुपयांची लाच घेताना वायरमन अटकेत
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे नवीन मीटर जोडणी केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पाचशे रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच स्विकारताना कंत्राटी वायरमन साहिल महमूद मन्यार रा. वर्षी ता. शिंदखेडा यास ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी…
