धुळे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार निलंबित; टोल नाक्यावर मद्यधुंद अवस्थेत गोंधळ

धुळे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार मुकेश यशवंत वाघ (पोहवा/१३‍०४) यांना शिस्तभंगाच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. धुळे-चाळीसगाव रोडवरील बोरविहीर पथकर नाक्यावर मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालून पथकर कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. घटना कशी घडली?२५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.१९ वाजता ही घटना घडली. बोरविहीर टोल नाक्यावरून MH-०४-FF-१३८०, MH-१२-KE-४८०८ आणि MH-०२-CZ-८२५८…

Read More

धुळे जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची विशेष मोहीम, चार आरोपींवर कारवाई

धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत २६ आरोपीना तडीपार करण्यात आले आहे. मात्र तडीपार असूनही प्रतिबंधित क्षेत्रात आढळून येणाऱ्या गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवून कारवाई केली आहे. चार आरोपीना अटक करून या पैकी दोन जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कलम 56 अन्वये जिल्ह्यातील…

Read More

दोन आयशर ट्रकमधून कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त!

नरडाणा पोलिसांची कारवाई धुळे : नरडाणा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत दोन आयशर ट्रकमधून महाराष्ट्रात बंदी असलेला कोट्यवधी रुपये किंमतीचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ रोजी पहाटेच्या दरम्यान नरडाणा पोलिसांना दोन संशयास्पद आयशर ट्रक दिसून आले. पोलिसांनी तत्काळ ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि…

Read More

पांझरा नदीत उडी घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह हेकळवाडी शिवारात सापडला

धुळे शहरातील एकवीरा देवी मंदिराजवळील पुलावरून पांझरा नदीत उडी घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह अखेर सहा दिवसांनी सापडला आहे. गोपाल दगा गुरव (वय ३३) असा या तरुणाचा मृतदेह हेकळवाडी शिवारातील मांडळरोड परिसरात आढळून आला. २८ सप्टेंबर रोजी रात्री गोपाल गुरव यांनी पुराच्या पाण्यात वाहत्या पांझरा नदीत उडी घेतल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिस आणि बचाव पथकाकडून सातत्याने…

Read More

धुळ्यात तरुणाचा खून; जुन्या वादातून चार आरोपींवर गुन्हा दाखल

धुळे शहरातील दक्षता कॉलनी परिसरात जुन्या किरकोळ वादातून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात घेतले आहे तर तिघांचा शोध सुरू आहे. मृत तरुणाचे नाव तेजस गणेश महिराळे (वय २०, रा. दक्षता कॉलनी, गोळीबार टेकडी रोड, धुळे) असे आहे….

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १७ लाख ५० हजारांचे एमडी ड्रग्स जप्त

धुळे : धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेने आज (२६ सप्टेंबर) सकाळी एमडी ड्रग्सवर मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत १७ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. मात्र एवढ्या महागड्या एमडी ड्रग्सचा…

Read More

सात हजारांची लाच भोवली; धुळे महापालिकेतील मुकरदम एसीबीच्या जाळ्यात

धुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील मुकरदमाला सात हजारांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या कारवाईने मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे. अटकेतील आरोपीचे नाव रवींद्र शामराव धुमाळ (वय ५०, रा. भटाई माता रिक्षा स्टॉप, मोहाडी उपनगर, धुळे) असे आहे. घटना अशी:प्रभाग क्रमांक १४ मधील सफाई कर्मचारी हा तक्रारदार असून त्याच्या दैनंदिन हजेरीचे अहवाल…

Read More

दोंडाईच्यात मोबाईल चोर गजाआड; ३० मोबाईल जप्त

दोंडाईचा – पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोराला अटक करून त्याच्याकडून तब्बल ३० मोबाईल हस्तगत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे ३ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मोबाईल चोरी व रेल्वेमध्ये मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोंडाईचा शहर पोलिसांनी…

Read More

लग्नाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या नागपूर टोळीचा पर्दाफाश

धुळे: लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या नागपूर येथील टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फिर्यादी तुषार रमेश खैरनार (वय 35, व्यवसाय- कॉम्प्युटर ऑपरेटर, रा. धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. घटना अशी घडली:तुषार यांच्या लग्नाचे वय निघून जात असल्याने त्यांची आई स्थळ शोधत होती. दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी लग्न लावणाऱ्या…

Read More

जैताणेतील संघशक्ती व्यायाम शाळेचे बॅनर फाडल्याप्रकरणी आरोपी निष्पन्न; निजामपूर पोलिसांची कारवाई

धुळे – जैताणे गावातील संघशक्ती सार्वजनिक व्यायाम शाळेचे बॅनर व सीसीटीव्ही कॅमेरा फाडून तोडफोड करणाऱ्या घटनेचा छडा निजामपूर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.राकेश भिका शेवाळे, रा. जैताणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ६.३० या वेळेत भवानी मंदिराजवळील व्यायाम शाळेच्या…

Read More
Back To Top