महाराष्ट्र
“एक पेड माॅ के नाम” उपक्रमांतर्गत साक्रीत वृक्षारोपण
साक्री येथील श्री. छत्रपती शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि साक्री तालुका निसर्ग मित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात “एक पेड माॅ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाचार ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून साक्री वनपरिक्षेत्राचे आर.एफ.ओ. विनायक खैरनार, निसर्ग मित्र समितीचे जिल्हा…
कॉपर केबल चोर अटकेत, निजामपुर पोलीसांची कारवाई !४० हजारांचा मुद्देमाल जप्त
निजामपूर पोलीसांनी कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करून 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील सौर प्रकल्पांमधील वारंवार होणाऱ्या वायर चोरीच्या घटनांवर पोलिसांनी प्रभावी आळा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10.35 वाजेच्या सुमारास सालटेक गावाच्या शिवारात असलेल्या Gail & Tornado Solar Companyच्या आयसीआर…
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सतर्कतेचा उपाय
जिल्ह्यातील जिम, आखाडे, बाउन्सर, बॉडीबिल्डर यांना देण्यात आल्या नोटिसा आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी निवडणूक काळात समाजात ‘मसल पॉवर’ निर्माण करण्याच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. निवडणुका जवळ आल्या की काही ठिकाणी बॉडीबिल्डर, बाउन्सर किंवा अशा व्यक्तींच्या माध्यमातून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो,…
धनेर आमळी येथे कार्तिकी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी
साक्री तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र धनेर आमळी येथे दरवर्षीप्रमाणे कार्तिकी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू कन्हैयालाल महाराजांची पूजा-अर्चा करून पारंपरिक यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. या धार्मिक उत्सवासाठी साक्री तालुक्यासह धुळे, नंदुरबार आणि शेजारील गुजरात राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यात्रेच्या काळात मंदिर परिसरात कन्हैयालाल महाराजांच्या दर्शनासाठी सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत भाविकांची रांग लागलेली…
देवपूर पोलिसांतर्फे ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन; सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकतेचा संदेश
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देवपूर पोलीस ठाणे, धुळे यांच्या वतीने आज दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या धाव स्पर्धेला नेहरू चौक, नुरानी मशीद, देवपूर बस स्टँड, नूरनगरमार्गे एसएसव्हीपीएस कॉलेजपर्यंतचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. कार्यक्रमात राष्ट्रीय एकता, सामाजिक सौहार्द आणि देशभक्तीचा संदेश…
२४ तासांत चैन स्नॅचिंग प्रकरणातील दोघे आरोपी जेरबंद,साक्री पोलीसांची कारवाई
साक्री शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा छडा लावत साक्री पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोघा आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले असून या वेगवान कारवाईबद्दल साक्री पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्राप्त माहितीनुसार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजेच्या सुमारास पिपळनेर येथील शोभाबाई कैलास गांगुर्डे आणि त्यांचे पती…
इच्छापूर येथे १४ वर्षीय रूपाली सरकची हत्या; प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीची भाजपा महिला आघाडीची मागणी
साक्री तालुक्यातील इच्छापूर येथे केवळ १४ वर्षीय रूपाली सरक या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा, या मागणीसाठी भाजपा साक्री तालुका महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाची भेट घेऊन पीडित कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार,…
भ्रष्टाचाराचे अड्डे, टक्केवारीचे खड्डे शिवसेना उबाठाने महानगरपालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात वेधले धुळेकरांचे लक्ष
धुळे शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. ‘भ्रष्टाचाराचे अड्डे, टक्केवारीचे खड्डे’ या घोषवाक्याखाली झालेल्या या आंदोलनाने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले. सध्या शहरात सुरू असलेल्या बे-मोसमी पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य अधिकच वाढले असून, गणपती रोड, स्टेशन रोड, फाशी पुल, दसेरा मैदान, पारोळा…
भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सदस्यपदी रोशन खैरनार यांची नियुक्ती; सामाजिक कार्यकर्त्याच्या निवडीचे स्वागत
धुळे शहरातील हिरे भवन येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित दीपावली स्नेहमेळावा आणि पदनियुक्ती सोहळ्यात निमखेडी गावचे सामाजिक कार्यकर्ते रोशन खैरनार यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या आदेशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. कार्यक्रमात…
ऑनलाईन फसवणुकीपासून ठाण्याचे दोन तरुण बचावले; पोलिसांच्या तत्परतेने मोठी घटना टळली
धुळे जिल्ह्यातील जामदा परिसरात ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने आलेल्या ठाण्यातील दोन तरुणांना आर्थिक फसवणुकीपासून वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. दोंडाईचा शहरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी सतर्कता दाखवत या तरुणांना चौकशीसाठी थांबवले आणि संभाव्य फसवणुकीचा पर्दाफाश केला. घटनेचा तपशीलपोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार दिवाळी उत्सव काळात दोंडाईचा शहरात विशेष गस्त ठेवण्यात आली होती. त्यानुसार २८ ऑक्टोबर रोजी…
