मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साक्रीत महारक्तदान शिबिर; ६५ बाटल्यांचे संकलन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा साक्री तालुक्याच्यावतीने आज, २२ जुलै रोजी साक्री येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण ६५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या.

हे शिबिर भाजपा जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे आणि जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले यांच्या संयोजनातून सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहाच्या आवारात पार पडले. रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

या उपक्रमास पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहनही कारणीभूत ठरले, ज्यांनी राज्यभर देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्याचे आवाहन केले होते.

या शिबिरात उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले, जि.प. सदस्य विजय ठाकरे, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रदीपकुमार नांद्रे, माजी नगराध्यक्षा जयश्री पवार, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, तसेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नंदुरबार येथील सेवा ब्लड सेंटरच्या टीमने रक्त संकलनासाठी विशेष मेहनत घेतली आणि शिबिर यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रतिनिधी निलेश सावळे साक्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top