संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे याचा परिणाम फळ भाजी विक्रेत्यांना होत आहे… पावसामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक कमी झाल्यामुळे टमाटे उत्पादकांना याचा फायदा बघायला मिळत आहे. मागील आठवड्यात टोमॅटोचे भाव अगदीच घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाट्यांची आवक कमी झाली आहे.. त्यामुळेच 400 ते 500 रुपयांना जाणारे टमाट्यांचे कॅरेट आता 1 हजार रुपयांवर येऊन पोहोचले आहे. किरकोळ बाजारात येणारे काही दिवस टमाट्याचे भाव 60 किलो इतक्या दराने विकले जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस टमाट्याचे भाव वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे…

