धुळ्यात जलगंगा मित्र मंडळाकडून पावनखिंडच्या लढाईचा देखावा

धुळे │ शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून विविध मंडळांच्या वतीने सादर होणाऱ्या सजीव देखाव्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातील जलगंगा मित्र मंडळाने यंदा ऐतिहासिक पावनखिंडच्या लढाईवर आधारित देखावा सादर केला आहे.

या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी रायाजी बांदल व त्यांच्या 300 बांदल सेनेसोबत कशाप्रकारे जीवाची पर्वा न करता महाराजांचा बचाव केला, हे थरारक दृश्य साकारण्यात आले आहे.

विशेष म्हणजे हा देखावा पूर्णतः मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मेहनतीने उभारला आहे. त्यामुळे पाहणाऱ्यांना प्रत्यक्ष पावनखिंडीत पोहोचल्याचा अनुभव मिळतोय.

पहिल्यांदाच धुळ्यात सादर झालेल्या या देखाव्याला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून गणेशभक्तांसाठी तो एक मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top