एका पत्रकाराच्या घरात भरदिवसा चोरी; सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव शहरातील महाबळ रस्त्यावरील अरुंधती अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी एका पत्रकाराच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोनं, चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, अरुंधती अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर पब्लिक लाईव्ह पोर्टलचे संपादक काशिनाथ चव्हाण आपल्या…
