
अहिल्यापुर येथे बारव विहिरीची श्रमदानातून स्वच्छता,पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची अपेक्षा
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापुर येथील ऐतिहासिक बारव विहिरीच्या स्वच्छतेसाठी सरपंच आणि स्थानिक ग्रामस्थांनी गुरुवारी श्रमदान मोहीम राबविली. या मोहिमे अंतर्गत विहिरीची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रदीप पवार यांनी बुधवारी या विहिरीची पाहणी करून सूचना दिल्या होत्या.खानदेशातील बारव विहिरींना सुमारे चारशे ते पाचशे वर्षांची परंपरा आहे .तसेच काही बारवांचा काळ बाराव्या तेराव्या…