धुळे जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची विशेष मोहीम, चार आरोपींवर कारवाई

धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत २६ आरोपीना तडीपार करण्यात आले आहे. मात्र तडीपार असूनही प्रतिबंधित क्षेत्रात आढळून येणाऱ्या गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवून कारवाई केली आहे. चार आरोपीना अटक करून या पैकी दोन जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कलम 56 अन्वये जिल्ह्यातील…

Read More

तुटपुंज्या मदतीच्या निषेधार्थ ठाकरे सेनेचे ‘हंबरडा आंदोलन’

शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी धुळे — अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अपुऱ्या आणि तुटपुंज्या मदतीच्या घोषणेविरोधात आज धुळ्यात शिवसेना (ठाकरे गट)च्या वतीने जोरदार ‘हंबरडा आंदोलन’ करण्यात आले. राज्य सरकारच्या फसव्या घोषणांचा निषेध करत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व ठाकरे सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले. शिवसेना कार्यालयापासून जिल्हाधिकारी…

Read More

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त जैताणे ग्रामपंचायतीत मोतीबिंदू शिबिर

निजामपूर-साक्री तालुक्यातील जैताणे मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ निमित्ताने जैताणे ग्रामपंचायत येथे भव्य मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 125 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 75 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आनंद (गुजरात) येथे करण्यात येणार आहे. यावेळी जेष्ठ नागरिकांचा सत्कार, तसेच जैताणे ग्रामदैवत भवानी माता मंदिर व संघशक्ती व्यायामशाळा परिसरात…

Read More

बुद्धगया, महू व दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवा

भारतीय बौद्ध महासभेचे जनआक्रोश आंदोलन धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली विविध बौद्ध व आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत जनआक्रोश आंदोलन छेडले. या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यामध्ये, 1949 चा घटनाबाह्य बोधगया मंदिर अधिनियम रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवावे, अशी पहिली मागणी करण्यात…

Read More

निजामपूर पोलिसांची मोठी कारवाई : गावठी हातभट्टीच्या अड्यांवर छापा; ₹२.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरीही आरोपी

धुळे : निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत तीन ठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्यांवर पोलिसांनी छापे टाकत तब्बल ₹२,६६,०००/- किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईत तिघा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, स्वतःच्या शेतात भट्टी लावण्यास मदत करणारा शेतकरीही आरोपी म्हणून पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. ११ सप्टेंबर रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस…

Read More

निमगूळ-टाकरखेडा रस्त्यावर भीषण अपघात; मांडळचे दोन तरुण ठार, एसटी चालकाविरुद्ध गुन्हा

दोंडाईचा (दि. ७) – शहादा रस्त्यावर निमगूळ-टाकरखेडा दरम्यान एसटी बस व दुचाकीचा झालेल्या भीषण अपघातात मांडळ (ता. शिंदखेडा) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शहादा आगाराची एमएच 20 बीएल 3330 क्रमांकाची बस दोंडाईचा कडून शहाद्याकडे जात होती. त्याच वेळी, एमएच 18 एयू 4307 क्रमांकाची दुचाकी घेऊन पावभा मंगल भील (वय…

Read More

धुळ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन; १९ ऑगस्टपासून संप सुरूच

राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज धुळे शहरातील क्यूमाईन क्लबसमोर थाळीनाद आंदोलन केले. १९ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या बेमुदत कामबंद आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, शासनाकडून अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या लहान मुलांसह थाळ्या वाजवत आणि जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा…

Read More

धुळेकरांनो सावधान! पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

धुळे : भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने धुळे जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. १ ते ५ सप्टेंबरदरम्यान दररोज मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असून ही शक्यता “अतिशय…

Read More

साक्री तालुक्यात युरिया खताची टंचाई; दोन शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकऱ्यांच्या तत्परतेने जीव वाचला साक्री तालुक्यात युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी संतापाच्या टोकावर पोहोचले आहेत. याच संतापातून दहिवेल बाजारपेठेत दोन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. उपस्थित शेतकऱ्यांच्या जागरुकतेमुळे दोघांचेही प्राण वाचले.मिळालेल्या माहितीनुसार, बोधगाव येथील शेतकरी लक्ष्मण सूर्यवंशी (५४) व डोंगरु बहिरम (३३) हे दिवसभर खतासाठी फिरूनदेखील युरियाची एकही बॅग मिळवू शकले…

Read More

साक्रीतील छडवेल पखरूण सरपंचपदी आक्काबाई गोयकर यांची बिनविरोध निवड

साक्री तालुक्यातील छडवेल (पखरूण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आक्काबाई सोमा गोयकर यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सरपंच मंदाकिनी नांद्रे यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. गावकरी पॅनलने दिलेल्या आश्वासनानुसार प्रथमच ठेलारी धनगर समाजातील व्यक्तीला सरपंचपदाचा मान मिळाला आहे. सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष सभेत अक्काबाई यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक…

Read More
Back To Top