भाटपुरा (ता. शिरपूर, जि. धुळे) – अनुभव शिक्षा केंद्र, धुळे यांच्या वतीने भाटपुरा गावात आयोजित करण्यात आलेला प्रेरणादायी ओरिएंटेशन कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात भाटपुरा तसेच परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या उत्स्फूर्ततेची झलक दाखवली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभव शिक्षा केंद्राच्या कार्याची, उद्दिष्टांची आणि युवकांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे याआधी या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या काही युवांनी आपले अनुभव थेट सांगून उपस्थितांना प्रेरणा दिली.
गावाच्या समस्या गावातल्या तरुणांनीच सोडवाव्यात, असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमासाठी अनुभव शिक्षा केंद्राचे विभागीय प्रशिक्षक श्री. दीपक देवरे यांनी युवकांना नेतृत्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि कार्यशीलतेविषयी प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मयूर राजपूत, चेतन जाधव, रणजीत जाधव, हंसराज चौधरी, ऋषिकेश राजपूत, कैलास जाधव, जितेंद्र जी महाराज व श्रावण चव्हाण यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख वक्त्यांमध्ये प्रवीण चव्हाण, सचिन पाटील, दीपक पाटील, मनोज पाटील, किशोर बंजारा, सोनी बंजारा व वैष्णवी हटकर यांनी मार्गदर्शन केले.
युवांमध्ये नवा जोम निर्माण करणारे भाषण ऋषिकेश राजपूत यांनी दिले.
तसेच, दिनेश जाधव, कैलास माळी, चेतन मोरे, जयेश बागुल, सुनील ठाकरे, समाधान पारधी व कुणाल पाटील या युवकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला व आपले अनुभवही मांडले.
कार्यक्रमाचे संयोजन व समन्वयाची जबाबदारी श्री. जितेंद्र राठोड (प्रशिक्षक, अनुभव शिक्षा केंद्र – धुळे) यांनी समर्थपणे पार पाडली.
कार्यक्रमाच्या समारोपाला सर्व युवकांनी गावाच्या व समाजाच्या हितासाठी नेतृत्व घेण्याचा निर्धार केला. ग्रामस्तरावर युवा नेतृत्व घडवण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरले.
प्रतिनिधी राहुल राठोड
