देशभरात घरबांधणीसाठी लागणाऱ्या सिमेंटवरील जीएसटी आता 10% करण्यात आली आहे. यामुळे घर बांधण्याचा खर्च आता लक्षणीय कमी होणार आहे.
३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ५६व्या GST कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याअनुसार, सिमेंटसह काही महत्त्वाच्या बांधकाम साहित्यांवरील करदर घटवण्यात आली आहे. आधी सिमेंटवर २८% जीएसटी लागायचा, जो आता 10% वर आला आहे. (बाईट )
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सिमेंट विक्रेते, बांधकाम व्यावसायिक आणि घर बांधण्याचा विचार करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे घर बांधकामाचा खर्च कमी होईल आणि नव्या घरासाठी गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबांना फायदा होईल.

