
मोटारसायकल चोरट्याच्या आवळल्या मुसक्या; धुळे पोलिसांची कारवाई
धुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३.२५ लाख रुपये किमतीच्या १० मोटरसायकली जप्त केल्या आहेत. तक्रारदार दिपक वंजारी (वय २८, रा. हाडाखेड, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, २४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११.३० वाजता…