
वार येथे जयहिंद एनएसएसचे विशेष हिवाळी शिबिर १ ते ७ जानेवारी दरम्यान पार पडले
जयहिंद हायस्कूल संलग्न जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे (एनएसएस) विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन १ ते ७ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. हे शिबीर धुळे जिल्ह्यातील वार तालुक्यात असणाऱ्या केंद्रीय आश्रम शाळेत मोठ्या उत्साहाने पार पडले.१ जानेवारी रोजी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती कल्याणी पाटील (महिला पोलीस उपनिरीक्षक,…