दोंडाईचा : निवडणूक काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलिसांचे मॉक ड्रिल

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोंडाईचा पोलिसांतर्फे मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी कोणताही अनावश्यक अनुशासनभंग किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलिस विभाग सज्ज असल्याचे या मॉक ड्रिलमधून स्पष्ट झाले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषद…

Read More

छडवेल–कोर्डे येथे स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील स्मृतिदिनानिमित्त भव्य आरोग्य निदान शिबिर

पंचक्रोशीतील 1100 हून अधिक रुग्णांची तपासणी साक्री तालुक्यातील छडवेल–कोर्डे येथे स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मोफत रोगनिदान व उपचार शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाहिर हरिभाऊ पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नंदूरबार, एस.एम.बी.टी. हॉस्पिटल घोटी आणि कांतीलक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या या शिबिरात पंचक्रोशीतून सुमारे 1100 हून अधिक गोरगरीब…

Read More

शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेत राज्य शासनाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ २०२४ पुरस्काराने विख्यात शिल्पकार राम सुतार यांचा सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नोएडा येथील श्री. सुतार यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये अशी रक्कम देण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

Read More

जळगाव एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग; मनपाचे सहा बंब दाखल

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात आर्यन चौफुली जवळ असलेल्या आर्यव्रत या केमिकल कंपनीला आज सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचे पाच ते सहा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीमध्ये कंपनीतील लाखो…

Read More

आदिवासी समाजाचे नेते रवी जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भाजपात करणार प्रवेश

धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आदिवासी समाजाचे नेते रवी जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा पालकमंत्री तथा भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते पार पडणार आहे. रवी जाधव यांच्या भाजप प्रवेशामुळे आदिवासी समाजात नव्या राजकीय समीकरणांची…

Read More

धुळ्यातील देवपूरमध्ये दहशत माजवणारी ‘चित्ते’ टोळी जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा कारवाईचा बडगा धुळे | प्रतिनिधी धुळे शहरातील देवपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात *‘चित्ते टोळी’*वर अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगल, विनयभंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या या टोळीमुळे परिसरातील शांतता धोक्यात आली होती. नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचा विचार करून पोलिस प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे….

Read More

मार्केट यार्ड लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

धुळे : मार्केट यार्ड परिसरातील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाची सभा दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये सौ. प्रतिभा मनोज ब्राह्मणकर अध्यक्ष, सौ. दिपाली विवेक दोडे उपाध्यक्ष, सौ. रजनी प्रदीप शिरोडे सचिव, सौ. अनिता दिलीप माकडे खजिनदार आणि सौ. नीलिमा…

Read More

साक्रीत “वंदे मातरम”च्या १५० वर्षांचा उत्सव साजरा

साक्री – भारत माता आणि देशभक्तीच्या भावनेने ओथंबलेल्या वातावरणात साक्री तालुका क्रीडा संकुल येथे “वंदे मातरम” गीताच्या १५० वर्षांचा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यांतील पाच हजारांहून अधिक देशप्रेमींच्या सहभागाने हा ऐतिहासिक शताब्दी महोत्सव साजरा झाला.या भव्य कार्यक्रमाचे आयोजन साक्री तालुका क्रीडा संकुल, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, तसेच सांस्कृतिक…

Read More

“एक पेड माॅ के नाम” उपक्रमांतर्गत साक्रीत वृक्षारोपण

साक्री येथील श्री. छत्रपती शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि साक्री तालुका निसर्ग मित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात “एक पेड माॅ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाचार ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून साक्री वनपरिक्षेत्राचे आर.एफ.ओ. विनायक खैरनार, निसर्ग मित्र समितीचे जिल्हा…

Read More

कॉपर केबल चोर अटकेत, निजामपुर पोलीसांची कारवाई !४० हजारांचा मुद्देमाल जप्त

निजामपूर पोलीसांनी कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करून 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील सौर प्रकल्पांमधील वारंवार होणाऱ्या वायर चोरीच्या घटनांवर पोलिसांनी प्रभावी आळा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10.35 वाजेच्या सुमारास सालटेक गावाच्या शिवारात असलेल्या Gail & Tornado Solar Companyच्या आयसीआर…

Read More
Back To Top