जैताणे येथील संघशक्ती सार्वजनिक व्यायामशाळेत अज्ञाताने केली तोडफोड
निजामपूर (ता. साक्री) : साक्री तालुक्यातील जैताणे गावातील ग्रामदैवत भवानी माता मंदिरासमोरील संघशक्ती सार्वजनिक व्यायामशाळेत अज्ञात व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केली. या तोडफोडीत व्यायामशाळेत लावलेले डिजिटल बॅनर, सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी लाईट व बल्बचे मोठे नुकसान झाले आहे.१५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता व १६ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येते….
