राजकीय
मंजूर कामांचे श्रेय घेऊ नका; आमदारांनी नवा निधी आणावा – अक्कलपाडा संघर्ष समितीचा टोला
धुळे – धुळे तालुक्यातील कनोलीमध्यम प्रकल्प, पुरमेपाडा लघु प्रकल्प, कुळथे व मांडळ लघु प्रकल्प तसेच सय्यदनगर फड बंधारा यांसारख्या सिंचन योजनांच्या दुरुस्ती व कालव्यांच्या नुतनीकरणासाठी प्रशासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळवण्यात माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांचा सक्रिय पाठपुरावा होता, असा दावा अक्कलपाडा संघर्ष समितीने केला आहे. या संदर्भात श्री. पाटील यांनी सप्टेंबर 2023 मध्ये जलसंपदा विभागाचे…
भिल कुटुंब आत्महत्या प्रकरणाचा निकाल – तीन आरोपींना दहा वर्षांची सक्त मजुरी
दोंडाईचा – शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे गावात २०१७ मध्ये घडलेल्या एकाच कुटुंबातील सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणात धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. या खटल्यात न्यायालयाने गावच्या तत्कालीन पोलीस पाटलासह तिघांना प्रत्येकी 10 वर्षांची सक्त मजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांनी हा निर्णय…
साक्री : उपनगराध्यक्षपदी उज्वला विजय भोसले यांची बिनविरोध निवड
साक्री – साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी उज्वला विजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी २९ जुलै २०२५ रोजी निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस आणि सेनेतर्फे दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची माघार झाली. त्यामुळे भाजपाच्या उज्वला भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शिरसाठ यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे…
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या धुळे दौऱ्याला शिवसेना (उबाठा)चा तीव्र विरोध; काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने
महाराष्ट्र राज्याचे कृषी कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या धुळे जिल्हा दौऱ्याला आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. मंत्री कोकाटे हे शिंदखेडा तालुक्यातील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी आले असताना, त्यांचा मुक्काम धुळे शहरातील टॉप लाईन हॉटेलमध्ये होता. त्याच ठिकाणी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. “मंदिरासारख्या पवित्र विधिमंडळात…
साक्री | नगराध्यक्ष पदासाठी उषा पवार यांचा अर्ज दाखल
भाजप व शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत नामनिर्देशन प्रक्रियेची पूर्तता साक्री : साक्री नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी आज सौ. उषा अनिल पवार यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला. या वेळी भाजप व शिवसेना (शिंदे गट)…
धुळे शहर विकासाला नवी गती; रावेर एमआयडीसीसह लॉजिस्टिक हब, थीम पार्क, सौर प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई/धुळे : धुळे शहराच्या सर्वांगीण औद्योगिक आणि नागरी विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विधानभवनात झालेल्या सचिवस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना गती देण्याचे आदेश देण्यात आले. रावेर परिसरातील 2077 एकर जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला असून, या भागात 8,500 कोटींच्या गुंतवणुकीसह लॉजिस्टिक हब आणि विविध उद्योग प्रकल्प उभारले जाणार…
आमदार अनुपभय्यांमुळेच २० हजार रहिवाशांना हक्काचा `सात-बारा’
अमोल मासुळे : मिल परिसरातील नागरिकांतर्फे आमदारांचा नागरी सत्कार धुळे शहरातील मिल परिसरातील जनतेला हक्काचा सातबारा मिळावा यासाठी मी गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत होतो. माझा पाठपुरावा निश्चित होता. परंतु विषय तडीस नेण्यासाठी मोठ्या पाठबळाची गरज होती. ते पाठबळ शहराचे आमदार अनुपभय्यांनी दिले. त्यांच्यामुळेच आज मिल परिसरातील २० हजार रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळणार आहे, असे…
‘एमजेपीजेएवाय’ योजनेत धुळे जिल्हा बनावा राज्यात आघाडीचा – आ.अनुप अग्रवाल यांचे आरोग्यसेवकांना आवाहन
धुळे (ता. २० जून २०२५): महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा (एमजेपीजेएवाय) अधिकाधिक लाभ गोरगरीब आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावा, यासाठी धुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवकांनी जबाबदारीने काम करावे. या योजनेतून धुळे जिल्हा राज्यातील सर्वाधिक लाभार्थी असलेला जिल्हा बनावा, यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत, असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले. शहरातील विविध खासगी रुग्णालयांत कार्यरत असलेल्या आरोग्यसेवकांची बैठक…
धुळे – नरडाणा – बाभळे एमआयडीसी उद्योजकांसाठी विशेष आढावा बैठक २२ जून रोजी
खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे आवाहन – उद्योजकांनी आणि महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहावे धुळे (दि. १९ जून २०२५) – धुळे, नरडाणा व बाभळे येथील एमआयडीसी क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि उद्योजकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ जून…
धुळे शहरातील विकासकामांना दिलासा; मुंबईत आढावा बैठकीत १६ प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय
धुळे l प्रतिनिधी l मुंबईत मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत धुळे शहरातील १६ प्रमुख विकासप्रस्तावांवर सखोल चर्चा होऊन त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार अनुप अग्रवाल यांनी थेट शहराच्या विकासासंदर्भातील मुद्दे मांडले. या वेळी महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह विविध विभागांचे…
