महाराष्ट्र
धुळे -नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव
मुंबई : राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली. विविध प्रवर्गांनुसार ठरविण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे. जाहीर यादीनुसार, ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ यांसह नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग खुला ठेवण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, सांगली, कोल्हापूर, लातूर,…
मराठा आरक्षणावरील जीआर रद्द करा; समता परिषद आक्रमक
धुळे – राज्य सरकारने जारी केलेला मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर तातडीने रद्द करावा, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच ओबीसी बांधवांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. परिषदेचे म्हणणे आहे की, ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशे पेक्षा अधिक जातींचा समावेश असून त्यांना अद्यापही पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र…
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेतून कै. इरफान शेख यांच्या कुटुंबीयांना २ लाखांचा धनादेश
निजामपूर-हस्ती को.ऑप. बँक,निजामपूर शाखेच्या खातेदार कै. इरफान मुश्ताक शेख यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार म्हणून“प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा”योजनेअंतर्गत विमा रक्कम प्रदान करण्यात आली. या योजनेतून दिवंगत शेख यांच्या वारसदार श्रीमती तरुन्नूमबी इरफान शेख यांना रु. २ लाखांचा धनादेश देण्यात आला. सदर धनादेशाचा प्रदान सोहळा बँकेचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप कुमारजी चोरडिया यांच्या हस्ते पार पडला….
सात हजारांची लाच भोवली; धुळे महापालिकेतील मुकरदम एसीबीच्या जाळ्यात
धुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील मुकरदमाला सात हजारांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या कारवाईने मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे. अटकेतील आरोपीचे नाव रवींद्र शामराव धुमाळ (वय ५०, रा. भटाई माता रिक्षा स्टॉप, मोहाडी उपनगर, धुळे) असे आहे. घटना अशी:प्रभाग क्रमांक १४ मधील सफाई कर्मचारी हा तक्रारदार असून त्याच्या दैनंदिन हजेरीचे अहवाल…
धुळ्यातून ई-वातानुकूलित बस सुरू करा; वाणी समाज संस्थेचे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे मागणी….
धुळे प्रतिनिधी – धुळे जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने मागे का ठेवले जात आहे? महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आधुनिक शिवशाही ई-बससेवा सुरू असताना, धुळे मात्र या सुविधेपासून वंचित आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या धुळे शाखेतर्फे शहरातून ई-वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची मागणी राज्य परिवहन महामंडळाकडे करण्यात आली. संस्थेचे शहराध्यक्ष मोहन येवले…
आदिवासी आरक्षणात सरकार पुरस्कृत घुसखोरी – शिवाजीराव ढवळे यांचा आरोप
धुळे : “आदिवासींच्या आरक्षणात काही समूहांची घुसखोरी हा सरकार पुरस्कृत कार्यक्रम आहे,” असा गंभीर आरोप आदिवासी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केला आहे. ते धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते. ढवळे म्हणाले की, “गेली २५ वर्षे आम्ही आदिवासींच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी आंदोलन करत आहोत. मात्र आज आमच्यासमोर…
निजामपूर-जैताणे आदर्श विद्या मंदिरात पालक-शिक्षक संघाची पहिली सभा
निजामपूर-जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात 2025-26 या शैक्षणिक वर्षातील पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची पहिली सभा उत्साहात पार पडली. या सभेला पालक-शिक्षक संघातील जवळपास 21 पालक सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक बी. आर. गावित यांनी भूषविले. तर उपमुख्याध्यापक एन. एम. शाह, उपप्राचार्य ए. एस. भदाणे, पर्यवेक्षक एस. एस. शिरसाठ, श्रीमती यू. व्ही. मोरे…
मराठा आरक्षणाच्या जी.आर. विरोधात ओबीसी समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत; सरकारच्या निर्णयाला विरोध
धुळे, १० सप्टेंबर २०२५ – महाराष्ट्र शासनाने दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या मराठा आरक्षण संदर्भातील शासन निर्णयावर (जी.आर.) ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र हरकत नोंदवण्यात आली आहे. या विरोधात जिल्हाधिकारी, धुळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री व सामाजिक न्याय विभागाला निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात ओबीसी समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, “ओबीसी वर्गात आधीच सुमारे साडेतीनशे…
धुळ्यात जन सुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीचे धरणे आंदोलन
धुळे : महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी, लोकशाहीला बाधक व जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याचा आरोप करत आज धुळ्यात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांसह विविध संविधान प्रेमी संघटनांनी गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन केले. राज्यव्यापी आंदोलनाच्या आवाहनानुसार धुळ्यातील नेते व कार्यकर्ते एकत्र जमले. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी “जन…
दोंडाईच्यात पोलीस दरबार संपन्न; कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या
दोंडाईचा : स्थानिक पोलीस ठाण्यात आयोजित पोलीस दरबारात बंदोबस्ताचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली हा दरबार पार पडला. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा बंदोबस्त यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, पोलीस ठाण्याचे कामकाज अधिक गतिमान…
