महाराष्ट्र
मेथी येथे खदानीविरोधात शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला
मेथी (ता. शिंदखेडा) येथे सुरू असलेल्या अनधिकृत खदानीविरोधातील आंदोलनादरम्यान आज 15 ऑगस्ट रोजी चार शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. गेल्या 11 दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषण करत असून, कालच तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. आज स्वातंत्र्य दिनी उपोषणस्थळी भरत धोबी, जगदीश गोसावी, खुमानसिंग गिरासे आणि प्रेमसिंग गिरासे…
थकीत कोट्यवधींच्या देयकांसाठी कंत्राटदार आक्रमक; १५ ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा
धुळे जिल्हा कंत्राटदार असोसिएशनने शासनाकडून वर्षभरापासून थकलेली कोट्यवधी रुपयांची देयके तातडीने न दिल्यास, येत्या १५ ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप महाले यांनी यासंदर्भात शासनाकडे परवानगी मागितल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाले यांनी सांगितले की, शेकडो कोटींची देयके थकल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. बँका, पुरवठादार, मजूर सतत पैशांसाठी तगादा…
शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी आढळली महादेवाची पिंड; मंदिर उभारणीच्या मागणीला जोर
शिंदखेडा येथील मेथी येथे गेल्या नऊ दिवसांपासून शेतकरी अनधिकृतपणे सुरू असलेल्या खदानीचे काम तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मेथी गावातील काही महिला आंदोलनस्थळी आल्या असता, त्यांनी खदानीच्या परिसरात पाहणी केली. यावेळी त्यांना खदानीच्या आत प्राचीन महादेवाची पिंड आढळून आली. या अनपेक्षित शोधामुळे आंदोलनस्थळी नवीनच चर्चेला उधाण आले…
नरडाणा : ‘पुष्पा’ स्टाईलने दारू तस्करीचा पर्दाफाश; टँकरमधील गुप्त कप्प्यांतून १ कोटींची दारू जप्त
धुळे पोलिसांनी ‘पुष्पा’ चित्रपटातील युक्तीप्रमाणे खाद्यतेलाच्या टँकरमध्ये गुप्त कप्पे बनवून होणारी विदेशी दारूची तस्करी उधळून लावली. स्थानिक गुन्हे शाखा आणि नरडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने मुंबई–आग्रा महामार्गावर आकांक्षा हॉटेलजवळ ही धडक कारवाई केली. गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी टाटा कंपनीचा संशयित टँकर अडवून चालक मोहनलाल पुरखाराम जाट (रा. राजस्थान) याची चौकशी केली. सुरुवातीला खाद्यतेल असल्याचा दावा करणाऱ्या चालकावर…
सायबर पोलिसांची तत्पर कारवाई; पॅथॉलॉजी लॅब डॉक्टरांचे 83 हजार परत
धुळे – सैन्यातील अधिकारी असल्याचे भासवून पॅथॉलॉजी लॅबमध्ये वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीतील 83 हजार रुपये सायबर पोलिसांनी काही तासांत परत मिळवून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी निदान पॅथॉलॉजी लॅबचे डॉ. प्रशांत देवरे यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून, “मी सैन्यातील अधिकारी आहे, आमच्या जिल्हा क्रीडा संकुलाजवळील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सामूहिक वैद्यकीय तपासणी करायची आहे” असे…
धुळ्यात वंचित बहुजन आघाडीचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
शिरपूर तालुक्यातील विविध विकासकामे, आरोग्य सेवा, बांधकाम विभागातील पारदर्शकता तसेच आदिवासी व वंचित समाजाच्या मूलभूत हक्कांशी संबंधित तक्रारींवर प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आज धुळ्यात धरणे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान आघाडीने अनेक मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. यामध्ये घरकुल योजनेत लाभार्थ्यांना प्रत्यक्षात घरे न मिळाल्याची गंभीर तक्रारही करण्यात आली. “घरकुल मंजूर असूनही ते…
सोनगीर पोलीसांचा गावठी दारूविरोधात धडक कारवाई; २.३१ लाखांचा मुद्देमाल नष्ट
धुळे – आज दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीत गावठी हातभट्टीविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. कापडणे, धनुर, लामकाणी, सोनगिर आणि सायने परिसरातील ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान गावठी हातभट्टी बनवण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन, साधनसामग्री तसेच तयार दारू मिळून एकूण ३३३० लिटर वॉश…
साक्रीत अँड. पूनम काकूस्ते यांची भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी निवड
साक्री तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका अँड. पूनम काकूस्ते (शिंदे) यांची भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, धुळे जिल्हा पालक मंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल, माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार…
जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा; एमआयएमला मोठा धक्का
धुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून माजी आमदार आरक्षण यांनी एमआयएम पक्ष सोडल्यानंतर आता धुळे शहर आणि जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष मुक्तार बिल्डर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दिपश्री नाईक, शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, युवा जिल्हाध्यक्ष रफिक पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राजीनामा पत्रात, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून धुळ्यातील स्थानिक…
धुळ्यात १४ ऑगस्टला होणार १ हजार एकशेएकरा फूट तिरंग्याची भव्य पदयात्रा
धुळे शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आणि अखंड भारत संकल्प दिनानिमित्त गुरुवारी (१४ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता १ हजार एकशेएकरा (११११) फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. या ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे करण्यात आले आहे. ही पदयात्रा मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज चौक येथून सुरुवात होईल….
