महाराष्ट्र
साक्रीत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा विराट मोर्चा
आदिवासी हक्क, शेतकरी प्रश्न आणि आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी साक्री शहरात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या मोर्चामुळे संपूर्ण साक्रीकरांचे लक्ष वेधले गेले. मोर्चाची सुरुवात आशापुरी मंदिरापासून झाली आणि तो तहसील कार्यालयावर धडकला. हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव व भगिनींनी सहभाग घेतला. तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसील प्रशासनाला तब्बल ५२ मागण्यांचे…
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १७ लाख ५० हजारांचे एमडी ड्रग्स जप्त
धुळे : धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेने आज (२६ सप्टेंबर) सकाळी एमडी ड्रग्सवर मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत १७ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. मात्र एवढ्या महागड्या एमडी ड्रग्सचा…
डॉ. जितेंद्र भामरे यांनी केले विद्यार्थ्यांच्या मानसिक कणखरतेसाठी योगाचे महत्त्व अधोरेखित
धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या तंत्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित योगा व ध्यान कार्यशाळेत बोलताना योगतज्ञ डॉ. जितेंद्र भामरे यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक कणखरतेसाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. तांत्रिक शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता व मानसिक स्वास्थ्य टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योगा व ध्यानामुळे विद्यार्थ्यांत मानसिक कणखरता वाढते तसेच शरीर-मनाचे संतुलन साधले जाते, असे प्रतिपादन…
धुळे जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा; शेतकरी संघटनेची मागणी
ळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः साक्री, शिरपूर आणि धुळे तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी केली आहे. ईश्वर पाटील यांनी सांगितले की, राज्य…
त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध
साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाकडून तहसीलदारांना निवेदन त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली असून, या अमानुष कृत्याचा साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाने तीव्र निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सरकारचा खासगी वसुली ठेकेदारांवर कोणताही अंकुश नसल्यानेच अशा घटना घडत असल्याचा आरोप संघटनेने करत,…
धुळे शहरात सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा; शकुंतला फाउंडेशनची मागणी
धुळे शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अर्धाकृती पुतळा असलेल्या ‘सुभाष चौकात’ आता पूर्णाकृती पुतळा उभारावा, या मागणीसाठी शकुंतला फाउंडेशनतर्फे धुळेकरांनी ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील जुना अमळनेर स्टॅन्ड परिसरात उभारलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अर्धाकृती पुतळा हे गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या अभिमानाचे प्रतीक मानले जाते. या परिसराला ‘सुभाष चौक’ म्हणून लोक ओळखतात. मात्र,…
धुळे तालुक्यात पावसामुळे मका पिकाचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात
धुळे शहरासह परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या पावसामुळे मका कपाशी , कांदा, कडधान्य , ज्वारी , बाजरी यांसह अनेक शेती पिकांचा बळी लागला आहे. धुळे तालुक्यातील आर्णी शिवारात मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत शेतकरयांचे हातात तोंडाशी आलेले मका…
बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; शिरपूर पोलिसांची कारवाई
शिरपूर तालुक्यातील वाडी गावात बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उध्वस्त करण्यात शिरपूर शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किस्मत भगवान कोळी (वय ४९) याला ताब्यात घेण्यात आले आहे, तर त्याचा मुलगा समाधान कोळी फरार झाला आहे. गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या…
शारदिय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात, एकवीरा देवी मंदिरात भाविकांची गर्दी
धुळे : आजपासून महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ, खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिर मध्ये शारदिय नवरात्र उत्सवाला विधिवत सुरुवात झाली. मंदिरात सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली असून, पूजा व घटस्थापना करून उत्सवाचे औपचारिक विधी पार पडले. मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी सांगितले की, नवरात्राच्या आगामी दहा दिवसांत येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे….
नंदुरबार चाकूहल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू; शहरात कडक बंद
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात मंगळवार १६ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री सुरत येथे मृत्यू झाला. या घटनेने नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण केले. खबरदारी म्हणून गुरुवारी शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली आणि शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व महाविद्यालयेही…
