धुळे शहरातील व्यापार वृद्धीसाठी कटिबद्ध – आ. अनुप अग्रवाल

धुळे शहरातील व्यापार अधिक वाढावा यासाठी जुन्या मनपाच्या संकुलातील व्यापाऱ्यांनी आपले करार संपल्यानंतरचे भाडे कोणताही दंड किंवा व्याज न भरता ३१ मेपूर्वी भरावे आणि नवीन करार करून घ्यावा, असे आवाहन आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी केले.

धुळे व्यापारी महासंघाच्या बिझनेस फोरम ग्रुप तर्फे आयोजित २०२५–२६ या आर्थिक वर्षाच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन कार्यक्रमात आमदार अग्रवाल यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. यात ७५० कोटींची मलनिसारण योजना, भूमिगत वीज व्यवस्था, व्यापारी संकुलांचे नूतनीकरण, पाणी पुरवठा, सोलर प्रकल्प, रस्त्यांची दुरुस्ती, आणि उद्योगांसाठी जमीन उपलब्ध करून देणे यांचा समावेश होता. या कामांसाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

GST विभागाचे राज्य उपायुक्त श्री. भानुदास माळी प्रमुख पाहुणे होते. त्यांनी धुळे, नंदुरबार आणि जळगावमधील व्यापाऱ्यांनी वेळेवर कर विवरण भरल्याबद्दल कौतुक केले आणि हा महाराष्ट्रातील विक्रम असल्याचे सांगितले. मंचावर महासंघाचे अध्यक्ष नितिन बंग आणि सचिव राजेश गिंदोडिया होते. यावेळी अध्यक्ष नितिन बंग यांनी नुकत्याच लागलेल्या आगीत व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान, करवाढ आणि व्यापारी भवनाच्या गरजेबाबत लक्ष वेधले. तसेच दिनदर्शिका तयार करणारे दीपक लुल्ला, अभिजीत सूर्यवंशी, प्रशांत देवरे, रवि भगत, अमित गेराई यांचा सत्कार करण्यात आला.

ही दिनदर्शिका सण, तिथी आणि महत्त्वाच्या तारखांसोबतच कर विवरण भरायच्या तारखा पण दाखवते. ती कैरी बॅगसह आणि हुकसह महासंघाच्या कार्यालयात मोफत उपलब्ध आहे.या कार्यक्रमाला शहरातील अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top